केडगावमध्ये सुविधा द्या अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन

 


युवा सेना शहर प्रमुख हर्षवर्धन कोतकर यांचे महापौर, आयुक्तांना निवेदन

माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर-  पावसामुळे केडगावमधील रस्त्यांचे अत्यंत दुरावस्था झाली असून विद्युत पुरवठा, पाणी पुरवठाही विस्कळित आहे. महापालिकेचा विकास निधी फक्त सावेडीसाठीच नव्हे तर केडगावसाठीही खर्च करण्यात यावा अशी मागणी युवा सेनेचे शहर प्रमुख हर्षवर्धन कोतकर यांनी महापौर, आयुक्त, स्थायी समिती सभापती यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. दरम्यान, केडगावधील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

नगर-पुणे महामार्गालगत केडगाव उपनगर असल्याने या परिसरात लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे. परंतु त्यांना महापालिकेकडून सुविधा मिळत नाहीत. नवीन वसाहतींमध्ये पाणी पुरवठा होत नाही, तो सुरळित करण्यात यावा, वादळी वार्‍याने लाईटचे पोल वाकले आहेत, पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात यावेत. वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळित करण्यात यावा. महापालिकेचा विकास निधी सावेडीसाठीच खर्च न करता केडगावसाठीही खर्च करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन युवा सेना शहर प्रमुख हर्षवर्धन कोतकर यांनी महापौर बाबासाहेब वाकळे, स्थायी समिती सभापती मनोज कोतकर, आयुक्त श्रीकांत मायलकवार यांना दिले आहे. कामे तात्काळ मार्गी न लागल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा कोतकर यांनी दिला आहे.


केडगाव स्मशानभूमीत विद्युत दाहिनी बसवावी

संपूर्ण जगभरात कोरोना महामारी सुरु आहे. अहमदनगर जिल्ह्यातही सुमारे 850 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याध्ये नगर जिल्ह्यात कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत होते. तसेच मृत्यूचे प्रमाणही जास्त होते. त्यामुळे अत्यंविधी करण्यासाठी अमरधामध्ये विलंब होत होता. अमरधामधील विद्युत दाहिनीवरील भार कमी करण्यासाठी केडगाव अमरधामध्ये विद्युत दाहिनी बसविण्यात यावी अशी मागणी युवासेना शहर प्रमुख हर्षवर्धन कोतकर यांनी केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post