राजीनाम्याच्या वृत्तावर एकनाथ खडसेंनी दिलं स्पष्टीकरण माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - मी भाजपा हा माझा पक्ष सोडलेला नाही तसेच राजीनामाही दिलेला नाही असं भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा आणि वृत्त काही प्रसारमाध्यमांनी प्रसारित केलं होतं. मात्र एकनाथ खडसे यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत मी भाजपा हा पक्ष सोडलेला नाही असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे नाराज आहेत. त्यांनी त्यांची नाराजी जाहीरपणे बोलूनही दाखवली होती. जळगावात गेल्या काही दिवसांपासून घटस्थापनेच्या दिवशी एकनाथ खडसे भाजपा सोडणार अशाही चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान एकनाथ खडसे यांनी मी पक्ष सोडलेला नाही, राजीनामा दिलेला नाही असं म्हटलं आहे.नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १७ ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. मात्र त्यानंतर विजयादशमी किंवा त्याआधी एकनाथ खडसे भाजपाला राम राम करुन राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्याही चर्चा रंगल्या. आज काही वेळापूर्वी काही प्रसारमाध्यमांनी एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडल्याच्या बातम्या चालवल्या. यानंतर एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण देत मी भाजपा सोडलेलं नाही आणि राजीनामा दिलेला नाही असं स्पष्टीकरण दिलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी एकनाथ खडसे यांना तिकिट दिलं नव्हतं. त्यामुळे ते चांगलेच नाराज झाले होते. एवढंच नाही तर त्यांना जमीन वाद प्रकरणात कोणत्याही प्रकारची क्लिन चीट न दिल्याने त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली होती. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. तीन दिवसांपूर्वीच छगन भुजबळ यांनीही एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत येणारच नाहीत असं नाही असं सूचक वक्तव्य केलं होतं. आज अचानक काही माध्यमांनी एकनाथ खडसेंनी राजीनामा दिल्याच्या बातम्या चालवल्या. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी स्वतः समोर येत आपण राजीनामा दिलेला नाही पक्ष सोडलेला नाही असंही सांगितलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post