फडणवीसांनी घेतला एकनाथ खडसेंचा राजकीय बळी; भाजप खासदार नारायण राणेंचे 'ते' ट्विट व्हायरल!

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षत्याग करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचे निश्चित केले आहे. उद्या शुक्रवारी (ता.२२) दुपारी एकनाथ खडसे राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश करणार आहेत. खडसे यांनी पक्ष सोडताना कोणत्याही नेत्यावर आरोप केले नाहीत. मात्र, त्यांनी विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती प्रहार केला. त्यांनी अनेक गंभीर आरोप करत फडणवीसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. तथापि खडसे जे काही आरोप करत आहेत ते अर्धसत्य असल्याचा दावा फडणवीस यांनी केला.  

या आरोपांच्या फैरी सुरू असतानाच भाजप नेते आणि खासदार नारायण यांनी फडणवीसांवर खडसेंवरून डागलेल्या तोफेचे ट्विट व्हायरल झाले आहे. त्यांनी २०१६ मध्ये आरोप करताना  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांचा राजकीय बळी घेतला असून #BJP मध्ये बहुजन नेतृत्वाला टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. असे ट्विट केले होते. 

हे ट्विट आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे. खडसे यांनी पत्रकार परिषदेत पक्ष सोडत असल्याची घोषणा करताना भावूक झाल्याचे दिसून आले.  त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, भाजप सरकारमध्ये माझ्या राजीनाम्याची मागणी कोणीही केली नाही. माझ्या चौकशीची सुद्धा मागणी झाली नाही. राजीनामा मागितला नसतानाही राजीनामा द्यायला लावला. माझी तक्रार देवेंद्रजींवर आहे. माझ्यावर त्यांनी विनयभंगाचा खटला दाखल करायला लावला. माझ्यासोबत अत्यंत खालच्या स्तराचं राजकारण केलं.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post