युवराजच्या 'खतरनाक' शुभेच्छांवर सेहवागची 'भन्नाट' प्रतिक्रिया


माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागचा आज ( दि २० ) ४२ वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसादिवशी त्याच्या चाहत्यांनी आणि संघ सहकाऱ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या. पण, यातील सर्वात हटके शुभेच्छा आहेत त्या युवराज सिंगच्या. त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून २००७ चा टी -  २० वर्ल्डकप जिंकल्यानंतर केलेल्या जल्लोषाचा फोटो टाकला. या फोटोत सेलिब्रेशनच्या नादात युवराज आणि सेहवाग मैदानावर पडल्याचे दिसते. या फोटोला युवराजने 'जेवढा खतरनाक यांचा खेळ आहे सध्या तेवढाचा खतरनाक सध्या ते अभिनय करत आहेत. लेजेंडरी मुल्तान का सुल्तान विरेंद्र सेहवागला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुला चांगले आरोग्य आणि यश लाभो खूप सारं प्रेम भावा.' असे कॅप्शन दिले. 

विरु हा त्याच्या हजरजबाबीपणा बद्दल प्रसिद्ध आहे. त्यामुळे युवराजच्या या खतरनाक शुभेच्छांवर विरूनेही तितकीच भन्नाट प्रतिक्रिया दिली. सेहवाग आपल्या प्रतिक्रियेत म्हणतो, 'गोलंदाज असो वा आपल्याच संघातील खेळाडू युवी वरती चढतोच. युवी शुभेच्छांसाठी आभार.'

सेहवाग आणि युवराजने सौरभ गांगुलीच्या नेतृत्वाखाली आपली आंतरराष्ट्रीय कारकिर्द सुरु केली होती. त्यांनी भारतासाठी अनेक महत्वाच्या स्पर्धा एकत्र खेळल्या आहेत. यात २००३ चा वर्ल्डकप, २००७ चा टी - २० वर्ल्डकप आणि २०११ च्या वर्ल्डकपचा समावेश आहे. सेहवागने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दित कसोटीत ८ हजार ५८६ तर एकदिवसीय सामन्यात ८ हजार २७३ धावा केल्या आहेत. तो २०१३ ला भारताकडून अखेरचा सामना खेळला होता.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post