ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांची गंभीर आजाराशी झुंज

माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव  सध्या अल्झायमरच्या आजाराला  तोंड देत आहेत.  आई या आजाराशी झुंज देत आहे. संपूर्ण कुटुंब तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहे. अशी माहिती सीमा देव यांचा मुलगा अभिनेता अजिंक्य देव यांनी ट्विट करून दिली आहे.

सीमा देव यांची प्रकृती बिघडल्याची माहिती त्यांच्या मुलानेच ट्विट करून दिली आहे. तमाम चाहत्यांना आईच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती देखील ट्विटमध्ये त्यांनी केली आहे. सीमा देव यांच्या प्रकृतीचे वृत्त समजताच चाहत्यांनी त्यांच्या आरोग्याप्रती प्रार्थना करून त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी धाव देवाकडे केली आहे.

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत एक काळ गाजवणार्‍या सीमा देव यांची लोकप्रियता आजही कायम आहे. मराठी आणि हिंदी सिनेजगतात आपल्या सुरेख अभिनयाच्या आणि तितक्याच मोहक रुपाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्‍या अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post