लोकल सुरू करायला राज्य सरकार तयार!; 'या' मंत्र्याचा गोयल यांच्यावर आरोपमाय अहमदनगर वेब टीम

मुंबई: 'मुंबईकरांना जो त्रास सहन करावा लागत आहे तो कमी करण्यासाठी नियमित लोकलसेवा सुरू करण्यात यावी', अशी अत्यंत महत्त्वाची मागणी राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. लोकलबाबत केंद्र सरकार राजकारण करत असल्याचा गंभीर आरोपही मलिक यांनी केला आहे.

राज्य सरकार अनलॉक प्रक्रियेदरम्यान अनेक सेवांना हिरवा कंदील दाखवत आहे. सरकारच्या परवानगीनंतर रविवारपासून मोनो रेल तर आजपासून पुन्हा एकदा मुंबई मेट्रो सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे लवकरच लोकलसेवा नियमित करण्यासही राज्य सरकार परवानगी देईल अशी आशा निर्माण झाली असून राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी याबाबत आज माध्यमांकडे महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. 

'मुंबईकरांचा त्रास कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने लवकरात लवकर नियमित रेल्वे सेवा सुरू करावी आणि महिलांसाठी विशेष सेवा सुरू करावी', अशी मागणीच त्यांनी केली. राज्य सरकारने सर्व महिलांना लोकलमधून प्रवास करण्यासाठी परवानगी दिल्यांतरही रेल्वेने तशी परवानगी अद्याप दिलेली नाही. त्यामुळे महिला प्रवाशांची गैरसोय होत आहे, असे मलिक यांनी नमूद केले. एकीकडे रेल्वेमंत्री पीयुष गोयल हे लोकल सेवा सुरू करण्यास आम्ही तयार आहोत पण राज्य सरकार परवानगी देत नाही, असे सांगतात आणि दुसरीकडे राज्य सरकारने परवानगी देऊनही महिलांसाठी लोकलची दारे खुली केली जात नाहीत, याचा अर्थ काय घ्यावा?, असा सवालच मलिक यांनी केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post