'या' अभिनेत्रीला मिळाली ही धमकी

माय अहमदनगर वेब टीम

मुंबई -कोणकोण नवरात्रीचा उपवास करत आहे, असे कंगनाने शनिवारी सोशल मीडियावर विचारले होते.

या पोस्टमध्ये कंगनाने महाराष्ट्रात तिच्याविरोधात दाखल झालेल्या FIR वरही प्रतिक्रिया दिली होती.

अभिनेत्री कंगना रनोटला सोशल मीडियावर बलात्काराची धमकी मिळाली आहे. ओडिशाच्या मेहंदी रझा नावाच्या एका वकिलाने 33 वर्षीय कंगनाच्या नवरात्री पोस्टवर कमेंट करताना 'मध्य शहरात तुझ्यावर बलात्कार व्हायला हवा," असे म्हटले आहे. मात्र जेव्हा सोशल मीडिया यूजर्सनी वकिलाला खडे बोल सुनावले तेव्हा त्याने फेसबुकवर स्पष्टीकरण दिले. मेहंदी रझाच्या म्हणण्यानुसार त्याचा फेसबुक आयडी हॅक झाला होता.

रझाने माफी मागताना आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "आज माझा फेसबुक आयडी हॅक झाला होता, माझ्या अकाउंटवरुन काही अपमानास्पद कमेंट पोस्ट करण्यात आल्या आहेत. कोणत्याही स्त्री किंवा समुदायाबद्दलचे हे माझे मत नाही. मला धक्का बसला असून मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो. माझी लोकांना विनंती आहे की त्यांनी माझी माफी मंजुर करावी. माझ्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांनी मला माफ करावे. मला घडलेल्या प्रकाराबद्दल खरोखर खेद वाटत आहे."


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post