ऑनलाइन परीक्षेमध्ये सुधारणा करा ; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे आंदोलन

 



माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने कोरोणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात होणाऱ्या ऑनलाइन परीक्षेमध्ये सुधारणा करून विद्यार्थ्यांचा मानसिक छळ थांबविण्यासंदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ समोर आमदार संग्राम जगताप व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर समवेत दादा दरेकर, वैभव म्हस्के, सुमित कुलकर्णी, प्रसाद कर्नावट, गौरव नरवडे, यशवंत तोडमल, विशाल म्हस्के, प्रितेश पानमंद, विशाल गागरे, देविदास टेमकर, केशव नरसाळे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.              कोरोनाच्या पार्श्वभूमीवरसंपूर्ण महाराष्ट्रात होणाऱ्या ऑनलाइन परीक्षेमध्ये सुधारणा करून विद्यार्थ्यांचा मानसिक छळ थांबवण्याच्या मागणीसाठी व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आपल्या विद्यापीठाअंतर्गत महाविद्यालयाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत मात्र या परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांना असंख्य प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे या अनुषंगाने परीक्षापद्धतीत त्रुटी विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणी नियोजनशून्यता, मॉक टेस्टचा अभाव, कुशल मनुष्यबळाचा अभाव, अपात्रताधारक सर्विस प्रोव्हायडर हेल्पलाइन केंद्राची व कार्यक्षमता व प्रशासकीय दिरंगाई, एम सी क्यू प्रश्न ची प्रश्नपेढी नपुरवणे यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत व ऑनलाईन परीक्षेत प्रश्न कसे असतील याची माहिती नसल्याने विद्यार्थ्यांना पाणी येत आहे व डिवाइस चा कनेक्टिव्हिटी चा अभाव व त्यावर मात केली की ऑनलाईन पेपर चे लॉगिन होत नाही लॉगिन झाले की पेपर येत नाही आणि पेपर आलास तर तो सबमिट होत नाही असे एक ना एक समस्या विद्यार्थ्यांना येत आहे,.  विद्यार्थ्यांना प्रश्न दिसणे साइटवर फक्त m.c.q. चे ऑप्शन येत होते वेळोवेळी विद्यापीठाची साईट क्रिश होत आहे. वेबसाईट मध्येअडचणी आल्यामुळे परीक्षा वेळेवर सुरू होत नाही विद्यार्थ्यांना कित्येक तास ताटकळत राहावे लागते परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे विद्यापीठाची हेल्पलाइन सतत व्यस्त लागत आहे परीक्षेच्या वेळेवर पेपर ओपन न होता 2 ते 4 तासांनी पेपर सुरू होत आहे काही विषयाचा पेपर अगदी रात्री उशिरा सुरू होत आहे तर काही वेळेस तो पुढेढकलावा लागत आहे.  एकाच दिवशी एकाच वेळी सर्व शाखांचे पेपर न घेता शाखानिहाय वेगवेगळ्या परीक्षा व्हायला हव्या होत्या त्यामुळे सर्वरवर तान आला नसताया सर्व अडचणीवर मात करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन सक्षम आहे असे वाटत नाही म्हणून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या वतीने विद्यापीठाच्या या नियोजन शून्य कारभारामुळे सपनाचा जाहीर निषेध करून विद्यापीठासमोर निदर्शन करण्यात आले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post