85 वर्षाच्या आजीबाईंनी केली कोरोनावर मातमाय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर- औरंगाबाद महामार्गावरील जुने एम्स हॉस्पिटल येथे महापालिका आणि कर्मयोगी प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी कोव्हिड सेंटर मधून आज 85 वर्षाच्या आजीबाईंनी कोरोनावर मात केली आहे. ह्या आजीबाईंना आज पुष्पगुच्छ देऊन कर्मयोगी प्रतिष्ठान'च्या सदस्यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच आजीबाईंना निरोगी जीवन जगण्याच्या शुभेच्छाही दिल्या. याप्रसंगी नगरसेवक नज्जू पैलवान, मा.समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी, इंजिनीयर अनिस शेख, नफीस चुडीवाला, डॉ. रिजवान अहमद, शाकीर शेख, फैय्याज मेंबर यांसह कोविड सेंटरचे डॉक्टर, नर्स आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना रफिक मुन्शी म्हणाले की कर्मयोगी प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी कोविड सेंटरच्या माध्यमातून कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत अनेक रूग्णांनी यशस्वीरीत्या कोरोनावर  उपचार घेऊन मात केली आहे. निशुल्क असे हे कोविड सेंटर आहे. उपचारासाठी होणार  सर्व खर्च कर्मयोगी प्रतिष्ठान करत आहे अशी माहिती त्यांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post