'चेन्नई एक्स्प्रेस नव्हे ही तर मालगाडी



माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली: IPL 2020 आयपीएलच्या १२ हंगामात सर्वात सातत्यापूर्ण कामगिरी करणारा संघ म्हणून चेन्नई सुपर किंग्जकडे (Chennai Super kings) पाहिजे जाते. पण या वर्षी मात्र त्यांची कामगिरी लौकिकाला साजेशी अशी झाली नाही. चेन्नईने १० सामन्यात फक्त ३ विजय मिळवले आहेत. चेन्नई संघाची अवस्था पाहून त्यांच्या चाहत्यांनाच नाही तर विरुद्ध संघांच्या चाहत्यांना विश्वास बसत नाहीय. राजस्थानविरुद्ध चेन्नईने या हंगामातील सर्वात कमी म्हणजे १२५ धावा केल्या आणि सामना ७ विकेटनी गमावला.

चेन्नईच्या सात पराभवानंतर कर्णधार धोनीच्या कामगिरीवर आता टीका सुरू झाली आहे. भारतीय संघाचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने (aakash chopra) चेन्नई संघाच्या कामगिरीवर हल्ला चढवला. युट्यूबवर शेअर केलेल्या व्हिडिओत आकाश चोप्रा म्हणाला, चेन्नई एक्स्प्रेसची आता मालगाडी झाली आहे आणि ती फार हळूहळू चालत आहे. सीएसकेसाठी ही स्पर्धा जवळ जवळ संपली आहे.

राजस्थानविरुद्धची मॅच त्यांच्यासाठी फार महत्त्वाची होती. जर त्यांनी सर्व सामने जिंकले तरी १४ गुण होतील. प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी अन्य संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागणार आहे.

चेन्नई संघाने केदार जाधवला संधी दिल्यावरून देखील आकाश चोप्राने टीका केली. राजस्थान विरुद्ध टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय योग्य होता. पण केदार जाधवला संधी का दिली? मला स्वत:ला केदार आवडतो पण त्याचा क्रम निश्चित नाही. त्याला खालच्या क्रमांकावर पाठवले आणि सर्व काही चुकले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post