जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवारमाय अहमदनगर वेब टीम

रविवार 20 सप्टेंबर रोजी स्वाती नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती ऐंद्र नावाचा शुभ योग तयार करत आहे. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...


मेष : शुभ रंग : पिस्ता| अंक : ५

समोरच्या व्यक्तीवर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहील. जोडीदाराचे मन जपण्याचा प्रयत्न कराल.


वृषभ : शुभ रंग : राखाडी| अंक : ३

आज फक्त कष्ट करीत राहा, फळाची अपेक्षा मात्र उद्याच करा. आज काही कंटाळवाणी कामे करावी लागणार आहेत. नोकरीत वरिष्ठांचे समाधान अशक्य.


मिथुन : शुभ रंग : पांढरा | अंक : १

आज कर्तव्यापेक्षा मौजमजेस प्राधान्य द्याल.चंगळवादी वृत्ती राहील. बऱ्याच दिवसांनी कही जुन्या मित्रांच्या सहवासात रमाल. आरोग्य उत्तम राहील.


कर्क : शुभ रंग : जांभळा | अंक : ७

कुटुंबात आज आर्थिक सुबत्ता नांदेल. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय कदाचित चुकण्याची शक्यता आहे.


सिंह : शुभ रंग : आकाशी|अंक : ४

व्यवसायात थोडी जाहिरातबाजी वाढवावी लागणार आहे. काही जुनी तत्त्व गुंडाळून ठेवावी लागणार आहेत.


कन्या : शुभ रंग : निळा|अंक : २

घरात थोरामोठ्यांशी काही मतभेद होण्याची शक्यता आहे. आज तुमची तब्येत जरा नरमच असेल.


तूळ : शुभ रंग : शुभ रंग : चंदेरी|अंक : ५

अती धावपळ टाळा. हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट वर्क करण्यास प्राधान्य द्या. व्यवसायात काही उत्तम संधी चालून येतील.


वृश्चिक : शुभ रंग : केशरी|अंक : ६

व्यवसायात वाढती स्पर्धा तुम्हाला बेचैन करेल. आज जमाखर्चाचा मेळ बसवणे जरा कठीण जाईल.


धनु : शुभ रंग : पिवळा|अंक : ३

प्रॉपर्टीचे काही अपुरे व्यवहार पूर्ण होतील. वास्तू व वाहन खरेदीसठी कर्जमंजुरी होईल. आज म्हणाल ती पूर्व.


मकर : शुभ रंग : क्रिम|अंक : ९

नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. विद्यार्थी कौतुकास्पद कामगिरी करतील.


कुंभ : शुभ रंग : तांबडा|अंक : ७

नोकरीच्या ठिकाणी आपण बरे,आपले काम बरे हे धोरण ठेवा. आज कुटुंबीयांना वेळ देणे गरजेचे आहे.


मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ८

आज काही गोडबोली माणसे भेटतील. कुणाच्या काही सांगण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. आज कोणतेही धाडस नकोच.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post