जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

 


माय अहमदनगर वेब टीम

रविवार 6 सप्टेंबर 2020 रोजी अश्विनी नक्षत्र असल्यामुळे वृद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये नशिबाची साथ मिळेल आणि लाभ होईल. वरिष्ठ अधिकारी आणि इतर मोठ्या लोकांची कामामध्ये मदत मिळेल. मोठे काम पूर्ण होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकासांठीसुद्धा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जणूं घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

मेष: शुभ रंग : तांबडा | अंक : ४

तरुणांनी मौजमजा करताना नितिमत्तेचे भान ठेवावे. उध्दटपणास लगाम गरजेचा. मर्यादेत रहीलेले बरे.

वृषभ: शुभ रंग : पांढरा | अंक : ८

आज तब्येतीच्या किरकोळ तक्रारीही दुर्लक्षित करू नका. विवाह जुळवण्याविषयी बोलणी उद्यावर ढकला. आज कोणतेही निर्णय उताविळपणे घेणे योग्य ठरणार नाही.

मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : ७

आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. व्यापारी वर्गाची बाजारातील पत वाढेल. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीनेही तुम्ही भाराऊन जाल. मस्त दिवस.

कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : ६

वेळेअभावी कौटुंबिक गरजांकडे तुमचे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे.थोरामोठयांच्या शब्दास मान द्यावा लागेल.

सिंह :शुभ रंग : मोरपंखी|अंक : ६

कार्यक्षेत्रात स्पर्धा अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. आज चर्चेपेक्षा झटपट निर्णय घेणे हिताचे राहील.

कन्या : शुभ रंग : मरून|अंक : ९

आज तुम्ही आपल्या मर्यादा ओळखून वागणेच हिताचे राहील. कामगारांनी स्वत:च्या सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे.

तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ४

महत्वाच्या वाटाघाटी, विवाह विषयी चर्चेसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. हातात पैसा राहील.

वृश्चिक : शुभ रंग : आकाशी|अंक : ८

वाढत्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना थकवा जाणवेल. कुटुंबातील सदस्यांची थोडी नाराजी पत्करावी लागेल.

धनु : शुभ रंग : पिवळा|अंक : ५

आज आवडत्या क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी मिळेल. चैनी व विलासी वृत्तीस खतपाणी घालाल.

मकर : शुभ रंग : भगवा|अंक : ३

अधिकारांचा गैरवापर टाळून कर्तव्यास प्राधान्य द्या. आज मुलांच्या शिस्तीकडे लक्ष पुरवावेे लागेल.

कुंभ : शुभ रंग : गुलाबी | अंक : २

रिकामटेकड्या चर्चेतून वाद होण्याची शक्यता आहे. समोरच्या व्यक्तीस मूर्ख समजण्याची चूक करू नका.

मीन : शुभ रंग : जांभळा | अंक : १

आज बरेच दिवसानी तुम्हाला अपेक्षित असलेल्या प्रिय व्यक्तीचा अचानक फोन येण्याची शक्यता आहे.गृहीणी पार्लरसाठी वेळ काढतील.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post