दररोज गरम पाणी प्या ; बारिक होण्यासह ‘या’ आजारांपासून झटपट मिळेल सुटका



माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - अनेकांना सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पिण्याचे फायदे माहित असतात. वजन कमी करण्यासाठी, पचनक्रिया व्यवस्थित राहण्यासाठी अशा अनेक कारणांसाठी लोक गरम पाण्यात लिंबू, मध वैगेरे घालून सकाळी पितात. आज आम्ही तुम्हाला रात्री गरम पाणी पिण्याचे काय फायदे आहेत याबाबत सांगणार आहोत.
रात्री झोपताना गरम पाणी प्यायल्यास शरीराच्या तापमानात वाढ होते. त्यामुळे जास्त घाम येण्याची सुद्धा शक्यता असते. तसंच ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते.
रात्री झोपण्याआधी कोमट पाणी प्यायल्याने शरिरात पाण्याचं प्रमाण संतुलित राहतं आणि शरिराचं तापमानसुद्धा नियंत्रित राहतं. ज्यामुळे कायम ताजंतवानं असल्याचं तुम्हाला जाणवतं.
इतकंच नाही तर रात्री गरम पाणी प्यायल्याने जर तुम्हाला ताण-तणाव असेल तर कमी होऊन मानसिक स्थिती चांगली राहण्यास मदत होते. त्यामुळे तुमची स्लिपसायकल सुद्धा प्रभावित होत असते. म्हणूनच मुड चांगला राहण्यासाठी हे आवश्यक असतं.

अन्न पचण्यासाठी गरम पाणी फायदेशीर ठरत असतं. जेव्हा तुम्ही एक ग्लास गरम पाणी पिता त्यावेळी जेवण चांगल्या पद्धतीने पचतं. दिवसाच्या तुलनेत रात्रीच्यावेळी डाएजेस्टिव्ह सिस्टीम जास्त सुस्त आणि कमजोर असते. म्हणून झोपताना गरम पाणी प्यायल्यास पोट चांगलं साफ होतं.
वजन कमी करण्यासाठी सुद्धा गरम पाणी फायदेशीर असतं. त्यासाठी सकाळी जर तुम्ही गरम पाणी पित असाल तर चांगला रिजल्ट दिसण्यासाठी रात्री सुद्धा गरम पाणी प्या. त्यामुळे अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी मदत होईल.
त्वचेच्या समस्येने हैराण असाल किंवा त्वचेसाठी वेगवेगळे सौंदर्यप्रसाधने वापरुन थकला असाल तर दररोज गरम पाणी पिणं सुरू करा त्यामुळे आपली त्वचा समस्येतून मुक्तता होईल आणि चेहराही उजळेल.
शरीर डिहाड्रेट होऊ द्यायचं नसेल तर सतत पाणी पिणं आवश्यक आहे. त्यासाठी रात्री जर तुम्ही गरम पाणी प्यायलात तर शरीराला पोषण मिळेल. त्वचेवर ग्लो येण्यासाठी दररोज रात्री गरम पाण्याचं सेवन करणं गरजेचं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post