सोमवारी पुष्य नक्षत्राच्या योगामुळे 7 राशीच्या लोकांना जॉब आणि बिझनेसमध्ये मिळू शकते नशिबाची साथ
माय अहमदनगर वेब टीम

14 सप्टेंबरला सोमवारी पुष्य नक्षत्र असल्यामुळे प्रजापती नावाचा शुभ योग जुळून येत आहे. चंद्र स्वराशीत राहील. तिथी, वार आणि नक्षत्र मिळून सर्वार्थसिद्धी नावाचा एक मोठा शुभ योगही जुळून येत आहे. या योगामध्ये खरेदी आणि गुंतवणूक केल्यास त्याचा फायदा मिळतो. आजच्या शुभ ग्रहस्थितीचा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

मेष : शुभ रंग : गुलाबी | अंक : १

दैनंदिन कामे सुरळीत पार पडतील. प्रकृती उत्तम साथ देईल. मुलांच्या अभ्यासात थोडे लक्ष घाला.

वृषभ : शुभ रंग : मरून | अंक : ३

आज नोकरी व्यवसायात थोडीफार अस्थिरता जाणवेल. तुमचे मनोबलही कमी असेल. हातचे सोडून पळत्यामागे धावायचा मोह होईल,पण तसे न करणेच हिताचे.

मिथुन : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ९

प्रिय मित्रमंडळींचा सहवास लाभेल. इतरांना आज काही महत्त्वपूर्ण सल्ले द्याल. अती स्पष्टवक्तेपणाने कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी.

कर्क : शुभ रंग : हिरवा | अंक : २

मानसिक प्रसन्नता राहील. किचकट कामातही जिद्दीने कार्यरत राहाल. क्षुल्लक गोष्टीनेही हळवे व्हाल.

सिंह : शुभ रंग : पांढरा|अंक : १

आज तुमचा एखाद्या सामाजिक कार्यात सहभाग राहील. गरजूंना सढळ हस्ते मदत कराल. वाद टाळावेत.

कन्या : शुभ रंग : जांभळा|अंक : ३

नवविवाहितांची काही अपुरी स्वप्ने साकार होतील. वाहन व वास्तू खरेदीसाठी कर्जमंजुरी होऊ शकते.

तूळ : शुभ रंग : आकाशी|अंक : ५

आज तुम्ही फक्त कर्तव्यास प्राधान्य देणार आहात.अधिकार वापरण्याच्या योग्य संधी चालून येणार आहेत.

वृश्चिक : शुभ रंग : निळा|अंक : ४

घरात काही कारणाने वडिलधाऱ्यांंशी मतभेद होतील. त्यांच्या वयाचा मान राखावा लागेल. कायद्यात रहावे.

धनु : शुभ रंग : सोनेरी|अंक : ६

जोखमीची कामे टाळलेली बरी. जे कराल ते तब्येतीस जपूनच करा. सुरक्षिततेस प्राधान्य देणे हिताचे.

मकर : शुभ रंग : चंदेरी|अंक : ८

आज तुम्ही अत्यंत उत्साही व ताजेतवाने असाल. एखाद्या नव्याने येणाऱ्या संधीचे तुम्ही सोने कराल.

कुंभ : शुभ रंग : राखाडी | अंक : ९

व्यावसायिक निर्णय घेताना भागिदारांना विश्वासात घेणे हिताचे. आज पत्नीचे सल्ले योग्यच असतील.

मीन : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ७

कार्यक्षेत्रात तुमची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू आहे. तुम्ही अगदी सहजच घेतलेले निर्णयही योग्यच ठरणार आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post