धक्कादायक : 306 नगरकरांचा कोरोनाने घेतला बळी

 


*आज नव्या ६२२ बाधितांची रुग्णसंख्येत भर*
माय अहमदनगर वेब टीम
*अहमदनगर*: जिल्ह्यात आज तब्बल ६२६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १९ हजार १८३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.४९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६२२ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३२१५ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १७४, अँटीजेन चाचणीत १९४ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २५४ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २३, संगमनेर ३२, राहाता १७, पाथर्डी १७, नगर ग्रामीण १३, कॅन्टोन्मेंट ०१, पारनेर ०२, अकोले १०, राहुरी ०३, कोपरगाव ४५, कर्जत ०१, मिलिटरी हॉस्पिटल १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १९४ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ३९, संगमनेर ०१,  राहाता ४० , पाथर्डी ११, नगर ग्रामीण २१,  कॅंटोन्मेंट ०९,  नेवासा २३, श्रीगोंदा ०३, पारनेर ११, कोपरगाव २० आणि कर्जत १६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २५४ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ९६, संगमनेर २२, राहाता १८, पाथर्डी ०३,  नगर ग्रामीण २६, श्रीरामपुर २९,  कॅन्टोन्मेंट ०३, नेवासा ११, श्रीगोंदा ०४,  पारनेर १७, अकोले ०७,  राहुरी १२, शेवगाव ०१,  कोपरगांव ०२, जामखेड ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ६२६ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा २२६, संगमनेर १४, राहाता ६८, पाथर्डी १०, नगर ग्रा.३१, श्रीरामपूर ४३, कॅन्टोन्मेंट ०८,  नेवासा १३, श्रीगोंदा ३२, पारनेर २४, अकोले ३३, राहुरी ३६, शेवगाव २५,  कोपरगाव २४, जामखेड ०९, कर्जत २७, मिलिटरी हॉस्पिटल ०२ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या: १९१८३*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:३२१५*

*मृत्यू: ३०६*

*एकूण रूग्ण संख्या:२२७०४*

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post