माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : टिव्ही 9 वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांच कोरोनामुळं पुण्यात निधन झाले आहे. ते 42 वर्षांचे होते. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले, आई वडील असा परिवार आहे. रायकर यांनी अहमदनगरमध्ये वृत्तवाहिनी प्रतिनिधी म्हणून काम केले तसेच गेल्या काही वर्षांपासून ते टिव्ही 9 चे प्रतिनिधी म्हणून पुण्यात काम पाहत होते.
रायकर यांच्या निधनामुळे पत्रकार क्षेत्रामधून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, आ.रोहित पवार, आ.आशुतोष काळे यांनी रायकर यांना श्रध्दांजली अर्पण करीत माध्यमांच्या प्रतिनिधींना कर्तव्य बजावताना स्वत:ची व परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.
रायकर यांना करोनामुळे त्रास होवू लागल्यावर ऑक्सिजन बेड लवकर उपलब्ध झाला नाही. अनेक हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. यासाठी माध्यम प्रतिनिधींनी मोठी धावपळ केली. मात्र वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
Post a Comment