उद्योगांसाठी लवकरच विशेष पॅकेज



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - करोनामुळे ज्या उद्योजकांचे नुकसान झाले आहे, त्यांच्यासाठी आम्ही एक विशेष पॅकेज तयार केले आहे. Special package for industries त्याला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर अधिकृत घोषणा करू. आम्ही उद्योगवाढीसाठी देखील काही योजना तयार केल्या आहेत. लवकरच त्याची अंमलबजावणी करू, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई industries minister Subhash Desai यांनी दिली आहे.

ते एका मराठी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात बोलत होते. उद्योग विभागाच्या महापरवाना योजनेद्वारा 48 तासात उद्योगांसाठी परवानगी देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

तेे म्हणाले, एका बाजूला करोनाचे व्यवस्थापन करावे लागणार आहे तर दुसर्‍या बाजूला अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. आम्ही काही कंपन्यांसोबत करार केले आहेत, ते फक्त कागदावर राहणार नाहीत. अनेक विदेशी कंपन्यांना महाराष्ट्रात यायचे आहे. त्यांच्याशी करार करून उद्योगवाढीसाठी प्रयत्न केले जातील. सगळ्या बाजारपेठा खुल्या करा, अशी मागणी व्यापारी करीत आहेत. त्यांची ही मागणी चुकीची नाही. मात्र, करोनाचे संकट गंभीर असले तरी उद्योग सुरू करावे लागतील, उद्योग मंत्रालयाने उद्योगांना चालना देण्यासाठी चांगल्या सुविधा देण्यास सुरुवात केली आहे.

एमआयडीसीने MIDC उद्योजकांना तयार शेड देण्याची तयारी केली आहे. नवीन गुंतवणूकदारांना उद्योगमित्र उपलब्ध करून देणार आहोत. महापरवाना ही योजना सुरू केली आहे. 48 तासात उद्योगांसाठी परवानगी देण्यात येईल, म्हणजे तत्काळ त्यांना उत्पादन घेता येऊ शकेल. महाजॉब्स हा देखील चांगला उपक्रम आपण सुरू असून याला युवकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

भूमिपुत्रांना रोजगार हा आमच्या सरकारचा मूळ कार्यक्रम आहे. रहिवासी दाखला हवा अशीच अट महाराष्ट्र शासनाने महाजॉब्समध्ये टाकली आहे. याद्वारे स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य दिले जाणार आहे. परप्रांतीय मजूर येत नसतील तर स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार द्या, अशा सूचना कंपन्यांना दिल्या आहेत, असेही देसाई म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post