महाआघाडीत काँग्रेस नेत्यांची नाराजी ?माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीप्रमाणे काँग्रेसदेखील महत्त्वाचा पक्ष आहे. मात्र, या सरकारमधून काँग्रेसला सतत डावलले जात आहे, असे काँग्रेस मंत्र्यांचे मत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ते दिल्लीत जावून सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यासोबत चर्चा केल्यानंतरही महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस नेत्यांच्या नाराजीचा मुद्दा कायम राहिला असल्याची चर्चा आहे. या नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली आहे, अशी माहिती एका काँग्रेस नेत्याने दिली. आपली नाराजी सोनिया गांधी यांच्याकडे व्यक्त करण्यासाठी सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, यांच्यासह मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्यात सरकारच्या कार्यप्रणालीबाबत असंतोष आहे. नव्याने शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. समन्वय समितीतून नाराजी दूर होत नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे काँग्रेस मंत्री पक्षश्रेष्ठींना याबाबत अवगत करतील. विशेष म्हणजे सोनिया गांधी यांच्यासोबतच्या दिल्लीतील बैठकीत महाष्ट्रातील काँग्रेसचे सर्व मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती एका काँग्रेस नेत्याने दिली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post