अखेर 'त्या' हरणाला वाचविण्यात यश
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - मुसळधार पावसामुळे एक हरीण पाण्याच्या जोरदार प्रवाहात नाल्यात वाहून जात होते, त्या हरणाला वाचविण्यात एसएआरआरपी, रॉ आणि सर्प संस्थेच्या स्वयंसेवकाना यश आले आहे. गोरेगाव पूर्वेला असलेल्या मोठ्या ड्रेनेज लाईनमध्ये हरीण अडकलेले होते. आरे जंगलातील एका नाल्यात मंगळवारी सकाळी ते पडले असावे, पावसामुळे नाल्यातील पाण्याच्या वाढत्या प्रवाहासोबत हे हरीण पुढे-पुढे सरकत होते असा अंदाज संध्याकाळी सर्प संस्थेशी संपर्क केलेल्या एका नागरिकाने व्यक्त करत हरीण नाल्यात दिसत असल्याचे सांगितले. त्यानंतर तातडीने सर्प संस्थेची टीम त्या ठिकाणी दाखल झाली. 

 

हरणाला त्या नाल्यातून बाहेर काढणे अवघड होते. त्यासाठी काही अत्याधुनिक साधने आणि मनुष्यबळाची गरज असल्याने सर्प संस्थेने तातडीने वनविभागाच्या समन्वयाने एसएआरआरपी आणि रॉ संस्थेला संपर्क केला. पावसाचा जोर ओसरल्यामुळे त्या हरणाच्या बचाव कार्यास तातडीने सुरुवात करण्यात आली. मॅनहोलमधून त्या हरणाला बाहेर काढण्यासाठी तब्बल एक तास प्रयत्न केल्यानंतर हरीण बाहेर काढण्यात यश आले. नंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बचाव केंद्रामध्ये त्याला दाखल केले असून तेथे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post