चीन-अमेरिकेच्या वाणिज्य राजदुतांमध्ये आर्थिक समन्वय वाढविण्यावर चर्चा

 

माय अहमदनगर वेब टीम

बीजिंग (वृत्तसंस्था) - चीन आणि अमेरिकेच्या वाणिज्य राजदुतांमध्ये द्विपक्षीय संबंधांतील समन्वय बळकट करण्यावर चर्चा झाली. दोन्ही देशांच्या वाणिज्य राजदुतांनी आर्थिक धोरणाबाब फोनवरून चर्चा केल्याचे चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केले.

अमेरिका आणि चीनमधील व्यापारी युद्धावर तोडगा काढण्यासाठी पहिल्या टप्प्याची सुरुवात करण्यात आली होती. त्याचाच भाग म्हणून दोन्ही देशांच्या वाणिज्य राजदुतांनी फोनवरून चर्चा केली आहे. या बैठकीबाबत चीनने सविस्तर माहिती दिली नाही.

मात्र दोन्ही देशांच्या आर्थिक विकासदराबाबत आणि रोजगार, महामाई आणि व्यापाराबाबत चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.चर्चेत चीनचे उपपंतप्रधान (व्हाईस प्रीमिअर) लियू हे आणि अमेरिकेचे वाणिज्य प्रतनिधी रॉबर्ट लिथीझर, राजकोष सचिव स्टीव्हन म्नूचिन यांचा सहभाग होता. दोन्ही बाजुंनी रचनात्मक संवाद झाला आहे. तसेच पहिल्या टप्प्यातील कराराची अंमलबजावणी करण्यावर चर्चा झाल्याचे चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी चीन व अमेरिकेत व्यापारी युद्ध भडकले होते. दोन्ही देशांनी परस्पर देशांच्या वस्तुंवर आयात शुल्क वाढविले होते. त्यानंतर पहिल्या टप्प्यात चीनने व्यापारातील तूट कमी करण्यासाठी अमेरिकेच्या कृषी उत्पादनांची खरेदी करण्याची तयारी दर्शविली होती. ट्रम्प यांचे आर्थिक सल्लागार लॅरी कुडलो यांनी बीजिंगच्या खरेदीवर व्हाईट हाऊस समाधानी असल्याचे माध्यमांना गेल्या आठवड्यात सांगितले होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post