आयुष्मान नावाच्या शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवातमाय अहमदनगर वेब टीम

शनिवार, 29 ऑगस्ट रोजी भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी असून आजच्या दिवशी पूर्वाषाढा नक्षत्रामुळे आयुष्मान नावाचा खास योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होईल. लव्ह लाइफमध्ये काहीतरी नवीन घडेल आणि संबंध सुधारतील. काही राशींवर ग्रहांचा चांगला प्रभाव असल्यामुळे शनिवारी धनलाभ होण्याची शक्यता राहील. इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...


मेष : शुभ रंग : मोरपिशी | अंक : २

व्यावसायिक चढ-उतारांचा सामना करावाच लागणार. इतरांनी दिलेल्या अश्वासनांवर अवलंबून राहू नका.


वृषभ: शुभ रंग : जांभळा | अंक : ५

काही मनाविरुद्ध घटना मनास बेचैन करतील.वैवाहिक जीवनात संध्याकाळी थोडेसे मतभेद होतील. एखाद्या विश्वासू माणसाकडूनही विश्वासघात होऊ शकतो.


मिथुन : शुभ रंग : डाळिंबी | अंक : १

काही दुरावलेल्या हितसंबंधांत सुधारणा होईल. पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. छान दिवस.


कर्क : शुभ रंग : मोतिया | अंक : ३

किचकट समस्या जिद्दीने सोडवाल. विरोधकांशी गोड बोलूनच स्वार्थ साधून घेणे गरजेचे. युक्तीने वागा.


सिंह : शुभ रंग : केशरी|अंक : ७

आत्मविश्वास वाढेल. ज्येष्ठांस उत्तम प्रकृती स्वास्थ्य लाभेल. आवडते छंद जोपासता येतील.


कन्या : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ४

एखाद्या धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. यथाशक्ती दानधर्म कराल. आज गृहिणी हसतमुख असतील.


तूळ : शुभ रंग : आकाशी|अंक : ९

मोठे आर्थिक निर्णय उद्यावर ढकललेत तर बरे होईल. रिकामटेकड्या गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य देणे हिताचे.


वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी|अंक : ६

आर्थिक आवक चांगली राहील. कुटुंबीयांच्या वाढत्या मागण्या हौशीने पुरवाल. अतिस्पष्टवक्तेपणा टाळावा.


धनु : शुभ रंग : गुलाबी | अंक : ३

तरुण वर्गाने नीतिमत्तेचे भान ठेवावे. उध्द्धटपणास लगाम गरजेचा. इतरांचेही ऐकून घेण्याची तयारी ठेवा.


मकर : शुभ रंग : तांबडा | अंक : ८

आवक पुरेशी असली तरी आज बचतीस प्राधान्य देणे गरजेचे. आरोग्यासाठी खर्च उद्भवू शकताे.


कुंभ : शुभ रंग : नारिंगी | अंक : ४

कुटुंबात आर्थिक सुबत्ता नांदेल. मौजमजेस प्राधान्य द्याल. चंगळवादी वृत्ती राहील. आज म्हणाल ती पूर्व.


मीन : शुभ रंग : चंदेरी | अंक : ७

अति धावपळ टाळा. हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क करण्यास प्राधान्य द्या. व्यवसायात काही उत्तम संधी चालून येतील. मित्रांना दूरच ठेवा.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post