पुढचे ४ दिवस मुसळधार पावसाचे ; यांनी दिला इशारा

 

माय अहमदनगर वेब टीम

मुुंबई - राज्याच्या विविध भागात पुढील 4 दिवस राज्यातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार (Heavy to Heavy Rainfall) पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे

भारतीय हवामान खात्याच्या मुंबई (IMD Mumbai) केंद्राचे उपमहासंचालक के. एस. होसळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 ऑगस्टला उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्याने पुढील 24 तासांत हे अधिक तीव्र होण्याची आणि पुढच्या 3-4 दिवसांत पश्चिमेकडे जाण्याची शक्यता आहे.येत्या 4-5 दिवसांत गुजरात, महाराष्ट्र व गोवा सर्वत्र मुसळदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.


या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज

महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, सातारा कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

20 ऑगस्टचा हवामानाचा अंदाज

उत्तर कोकण - 

रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुळधार पावसाचा अंदाज

पालघर, ठाणे आणि मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज

दक्षिण कोकण -

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज.

उत्तर-मध्य महाराष्ट्र -

पुणे आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुळधार पावसाचा अंदाज

दक्षिण मध्य-महाराष्ट्र -

सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात, घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज

मराठवाडा -

नांदेड, परभणी आणि हिंगोलीत मुसळधार पावसाचा अंदाज

21 ऑगस्टचा हवामानाचा अंदाज

उत्तर-मध्य महाराष्ट्र -

पुणे आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुळधार पावसाचा अंदाज

नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज

दक्षिण मध्य-महाराष्ट्र -

सातारा आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज

मराठवाडा -

औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज

22 ऑगस्टचा हवामानाचा अंदाज

उत्तर-मध्य महाराष्ट्र -

पुणे आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुळधार पावसाचा अंदाज

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज

23 ऑगस्टचा हवामानाचा अंदाज

उत्तर कोकण -

रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुळधार पावसाचा अंदाज

पालघर, ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज

दक्षिण कोकण -

रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज.

दक्षिण मध्य-महाराष्ट्र -

सातारा आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज..

कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथअयावर आणि गुजरात राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमधील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तसेच पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हे सर्व लक्षात घेत केंद्रीय जल आयोगाने राज्यांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. कोकण, गोवा आणि महाराष्ट्राच्या पश्चिम घाट परिसरातील डोंगररांगांमध्ये पुढील 4-5 दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने राज्यातील दमगंगा, उल्हास, सावित्री, काळू नद्यांसह तापी आणि इतर नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post