मोठी बातमी! राज्यात उद्यापासून एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरु; पासची गरज नाही

 

माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - अवघ्या तीन दिवसांवर आलेला गणेशोत्सव आणि राज्यातील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता उद्या २० ऑगस्टपासून राज्यात एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यात येणार आहे. याकरिता ई पासची आवश्यकता नाही. त्यामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे राज्यातील एसटीची धाव २३ मार्चपासून बंद ठेवण्यात आली आहे. २२ मे पासून राज्यातील रेड आणि कंटेनमेंट झोन वगळता जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरु करण्यात आली. परंतु त्याकडे प्रवाशांनी पाठफिरवली आहे. मिशन बिगेन अगेन अंतर्गत अनेक सवलती दिल्या जात आहेत. त्यानुसार राज्यातील एसटीची वाहतूक सुरु करण्याची मागणी जोर धरत होती. 


नागरिकांना ग्रामीण भागात प्रवासासाठी प्रवासाचे प्रमुख साधन एसटी आहे. एसटीच बंद आसल्याने प्रवाशांना खासगी गाड्यांवर आवलंबून रहावे लागते. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भु्र्दंड देखील सहन करावा लागतो. तसेच राज्यात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवाचा सण साजरा करण्यात येतो.


गणेशोत्सवासाठी नागरिकांना प्रवास करता यावा याकरिता देखील एसटीची वाहतूक सुरु करण्याची मागणी आहे. त्यानुसार राज्य सरकारने एसटी महामंडळाला आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यास परवानगी दिली आहे. परंतु ही वाहतूक अंशत: असल्याचे समजते. तसेच टप्प्याटप्प्याने ही वाहतूक वाढविण्यात येणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post