माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अद्याप कोमात..!

 


माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत नसल्याचे त्यांच्यावर उपचार सुरु असलेल्या दिल्ली कॅन्टोन्मेंटच्या आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलने कळवले आहे.

अद्यापही ते दीर्घ कोमात असून व्हेटिंलेटरवर असल्याचं रुग्णालयाच्या हवाल्याने एएनआयनं ट्विट केलं आहे. प्रणव मुखर्जींच्या प्रकृतीबाबतचे सर्व महत्वाचे वैद्यकीय मापदंड स्थिर असल्याचेही रुग्णालयाने म्हटलं आहे.

राजाजी मार्ग येथील घरी घसरुन पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यामुळे ८४ वर्षीय मुखर्जी यांच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ झाली होती. ही गाठ काढण्यासाठी त्यांच्यावर मेंदू शस्त्रक्रियाही करण्यात आली. तेव्हापासून त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post