‘भाभीजी घर पर हैं’ फेम 'भाभी' बदलणार?माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - लोकप्रिय मालिका ‘भाभीजी घर पर हैं’ फेम ‘गोरी मॅम’ म्हणजेच सौम्या टंडनने (अनिता भाभी) मालिका सोडल्याचे वृत्त समोर आले होते. मालिकेचे शूटिंग सुरू झाले आहे. परंतु, कोरोनामुळे ती खूप घाबरली आहे. तिच्या घरात लहान बाळ आणि म्हातारी आई आहे. त्यामुळे ती ‘भाभीजी घर पर हैं’ मालिका पुढे करू शकत नाही, असेही वृत्त समोर आले होते.

या वृत्तानंतर तिचे फॅन्स निराश झाले होते. असं म्हटलं जात होतं की, सौम्या टंडनच्या जागी 'कांटा लगा' फेम शेफाली जरीवालाला रिप्लेस करण्यात येईल. परंतु, शेफालीशी संबंधित सूत्रांनी सांगितलं की, असं काही नाही. त्यांना प्रोडक्शन हाऊसकडून कुठलाही कॉल आलेला नाही. ती आपल्या फॅन्सना याबद्दल नक्की सांगेल.मागील वर्षी सौम्याने बाळाला जन्म दिला होता. सौम्या टंडनने मुंबईमध्ये बॉयफ्रेंड सौरभशी गुपचुप लग्न केले होते. सौरभ एक बँकर आहे आणि तो मुंबईत नोकरी करतो.
आता अनिता भाभी (सौम्या टंडन) ही 'भाभीजी घर पे हैं'मध्ये दिसणार की नाही, याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post