'या' अभिनेत्रींसोबत राजेश खन्ना यांची जबरदस्त केमिस्ट्री


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - बॉलिवूडचे सुपरस्टार राजेश खन्ना यांचा आज १८ जुलैला स्मृतिदिन आहे. २०१२ मध्ये राजेश खन्ना यांचा मृत्यू झाला होता. मृत्यूच्या ८ वर्षांनंतरदेखील बॉलिवूडमधील सर्वात रोमँटिक हिरो म्हणून राजेश खन्ना यांचे नाव घेतले जाते. या औचित्याने त्यांचे काही सदाबहार चित्रपट पाहुया.

राजेश खन्ना आणि टीना मुनीम
राजेश खन्ना आणि टीना मुनीम यांनी पहिल्यांदा १९८१ मध्ये 'फिफ्टी फिफ्टी'मध्ये एकत्र काम केले होते. असे म्हटले जाते की, राजेश खन्ना यांनी पत्नी, अभिनेत्री डिंपल कपाडियाला टीना मुनीमसाठी सोडलं होतं.

राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर
राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांची अफलातून केमिस्ट्री अनेक चित्रपटांतून पाहायला मिळाली. सुरूवातीला 'आराधना'मध्ये दोघांनी एकत्र काम केलं होतं. 'आराधना'नंतर 'सफर' (१०७०), 'अमर प्रेम' (१९७२), 'दाग' (१९७३) मध्ये काम केलं. दोघांची ऑनस्क्रिन जोडी हिट ठरली.

राजेश खन्ना आणि हेमा मालिनी
हेमा मालिनीने राजेश खन्ना यांच्यासोबत सर्वांत अधिक चित्रपट केले. यामध्ये 'महबूबा' (१९७६), 'डार' (१९८१) आणि 'कुदरत'(१९८१) चित्रपटांचा समावेश होता.

राजेश खन्ना आणि जीनत अमान
राजेश खन्ना आणि जीनत अमान यांनी 'जानवर,' 'आशिक हू बहारों का,' 'छैला बाबू,' 'अजनबी' यासारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं.

राजेश खन्ना आणि मुमताज
मुमताज यांनी दारा सिंह, दिलीप कुमार, शम्मी कपूर, देवानंद, संजीव कुमार, जितेंद्र, शशी कपूर या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले. परंतु, राजेश खन्नासोबत त्यांची जोडी चांगली जमली. या जोडीने 'दो रास्ते', 'सच्चा-झूठा', 'आपकी कसम', 'अपना देश', 'प्रेम कहानी', 'दुश्मन', 'बंधन' आणि 'रोटी' यासारखे सुपरहिट चित्रपट दिले.

असे म्‍हटले जाते की, १९७४ मध्‍ये मुमताज यांनी मयूर मधवानी यांच्‍याशी विवाह केला. परंतु, राजेश खन्ना त्यामुळे निराश होते. कारण, मुमताज यांनी आता लग्‍न करू नये, अशी राजेश खन्ना यांची इच्‍छा होती. लग्‍नानंतर मुमताज यांनी चित्रपटात काम करणं सोडून दिलं.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post