#OnThisDay; सुपर ओव्हरचा थरार!



माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - मागील वर्षी म्हणजेच २०१९ मध्ये आजच्या दिवशी झालेल्या सामन्यात सुपर ओव्हरचा थरार रंगला होता. १४ जुलै २०१९ ला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत इंग्लंड नवा विश्वविजेता ठरला. न्यूझीलंडने ५० षटकांत २४१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील २४१ धावाच केल्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. पण सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीतच सुटला. त्यामुळे मूळ सामन्यात लगावण्यात आलेल्या सर्वांधिक चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता ठरवण्यात आले. याचीच आठवण करून देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल होत आहे.


कसा रंगला सामना?

न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना २४१ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ अखेरच्या चेंडूवर बरोबर २४१ धावांवर ऑल आऊट झाला. त्यामुळे सामना सुपर ओव्हरवर गेला. ज्यावेळी इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी अखेरच्या षटकात १५ धावांची गरज होती. तेच आव्हान त्यांनी सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंड समोर ठेवले. यामध्ये ८४ धावा करून इंग्लंडचा किल्ला अखेरपर्यंत लढवला. त्यानेच सुपर ओव्हरमध्ये ८ तर बलटलरने ७ धावा केल्या.

हे १५ धावांचे आव्हान आव्हान पार करताना जोफ्राने पहिलाच चेंडू वाईड टाकला त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर नीशामने २ तर तिसऱ्या चेंडूवर षटकार खेचला. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर पुन्हा दोन धावा केल्या, त्यामुळे अखेरच्या चेंडूवर २ धावांची गरज होती. हे षटक सामन्याच्या अखेरच्या षटकाप्रमाणेच सुरु होते. पण, फरक फक्त आता न्यूझीलंड फलंदाजी करत होता. अखेरच्या चेंडूवर २ धावांची गरज होती त्यावेळी दुसरी धाव घेताना गप्टिल धावबाद झाला. ही सामन्याच्या अखेरच्या षटकाचा क्लोन असल्याचेच भासले. सुपर ओव्हरही टाय झाली. ही इतिहासातील पहिली घटना आहे की वर्ल्डकपचा सामना टाय झाला सुपर ओव्हरवर गेला आणि सुपर ओव्हरही टाय झाली अखेर इंग्लंडने चेंडू सीमापार धाडण्याची शर्यत जिंकल्याने इंग्लंड विजयी झाला.

या विजयाबरोबरच इंग्लंडने वर्ल्डकपच्या सुरुवातीनंतर तब्बल ४४ वर्षानंतर इंग्लंडला आपले पहिले विजेतेपद पटकावले. न्यूझीलंडने या सामन्यात अत्यंत उच्च दर्जाचा खेळ करुनही त्यांना सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये येऊनही वर्ल्डकपने हुलकावनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post