राज्यात 9431 नवे रुग्ण ;6044 बरे होऊन घरी परतले


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राज्यात रविवारी ९४३१ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले. दिवसभरात ६०४४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दिवसभरात २६७ बाधितांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण रुग्णसंख्या ३ लाख ७५ हजार ७९९ वर गेली असून २ लाख १३,२३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे होण्याचे प्रमाण ५६.७४ टक्के झाले आहे. सध्या १,४८,६०१ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मृतांची एकूण संख्या १३,६५६ झाली आहे.

मराठवाड्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण घटले, दिवसभरात 365 नवे रुग्ण, 13 बळी
औरंगाबाद / मराठवाड्यात विशेषत: औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी कोरोना रुग्णसंख्येचे प्रमाण बरेच घटले असून ३६५ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली, तर १३ बाधितांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद ६, उस्मानाबाद ३, परभणी जिल्ह्यातील दोन, तर नांदेड आणि जालना येथे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, रविवारी औरंगाबादेत १३०, बीड २५, जालना ९३, नांदेड ७२, उस्मानाबाद २४ आणि हिंगोली जिल्ह्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे.

पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे पॉझिटिव्ह
पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांना कोरोनाचे निदान झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून ते मुंबईत कामानिमित्त आले असून त्या वेळी संसर्ग झाल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यांच्यावर मुंबईतच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अलीकडेच त्यांनी लातूर, उस्मानाबाद, उदगीर येथे बैठका घेतल्या होत्या. त्यामुळे संपर्कात आलेल्या लोकांनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post