'दम आहे तर जीडीपी रोजगार वाढवा....दाढी मिशा कोणीही वाढवू शकतो'माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - देशात कोरोना महासंकटाने निर्माण झालेल्या  स्थितीवरून तसेच चीनने केलेल्या घुसखोरीमुळे काँग्रेसकडून  सातत्याने केंद्र सरकार प्रहार केला जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या आठवड्यात व्हिडिओ व्हायरल करत  केंद्र सरकारवर कडाडून हल्ला चढवला आहे.

काँग्रेस खासदार आणि  गुजरात काँग्रेसचे प्रभारी राजीव सातव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली आहे. दम आहे तर जीडीपी रोजगार वाढवा.. दाढी मिशा कोणीही वाढवू शकतो, असे बोचरे ट्विट सातव यांनी केले आहे.

चीनसोबतच्या सीमावादावरून काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करीत आहेत. ‘सत्य का सफर : राहुल गांधी के साथ,’ या व्हिडीओ सीरिजमधून राहुल गांधी सरकारवर निशाणा साधत आहेत. गुरुवारी या सीरिजमधील तिसर्‍या भागात बोलताना त्यांनी चीनला कसे सामोरे जायचे याची द‍ृष्टी पंतप्रधानांकडे नाही, अशी टीका केली. तसेच, त्यामुळे चीन आपल्या सीमेत येऊन बसला असल्याचेही त्यांनी सांगितले.राहुल गांधी म्हणाले की, जर चीनशी सामना करण्यासाठी आपण मजबूत स्थितीत असलो तरच आपण व्यवस्थित काम करू शकू. त्यांच्याकडून आपल्याला जे पाहिजे ते मिळवू शकू. किंवा आपल्याला जे करायचे आहे ते करू शकू. मात्र, चीनला आपली कमकुवत बाजू लक्षात आली तर गडबड होऊ शकते.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या चीनसोबतची लढाई कोणत्याही दूरद‍ृष्टीशिवाय लढली जात आहे. चीनसोबत असे लढता येणार नाही. मी केवळ राष्ट्रीय द‍ृष्टिकोन कसा असावा याबाबत बोलत नसून, मला आंतरराष्ट्रीय द‍ृष्टिकोनाबाबत बोलायचे आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post