राजस्थान सत्तासंघर्ष; सचिन पायलट यांना दिलासा; काँग्रेसला धक्का


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - राजस्थानात सुरू असलेल्या सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावली झाली. राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष सी. पी. जोशी यांनी हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र, जोशी यांनी केलेली मागणी कोर्टाने फेटाळून लावली आहे.

सी. पी. जोशी यांनी सचिन पायलट यांच्यासह १९ आमदारांना अपात्र घोषित करण्याबाबतत नोटीस बजावली होती. या नोटिसीला पायलट समर्थक आमदारांनी कोर्टात आव्हान दिले होते. या याचिकेवर राजस्थान उच्च न्यायालयाने सुनावणी केली होती. १९ आमदारांच्या नोटिसीवर २४ जुलैपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये, असे आदेश जोशी यांना दिले होते. त्यानंतर जोशी यांनी हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.

तर सचिन पायलट समर्थक आमदारांनीही कॅव्हेट याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी जोशी यांच्या वकिलाने हायकोर्टाच्या सुनावणीला स्थगिती देण्याची मागणी केली होती.

आज न्यायमूर्ती अरूण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठाने म्हटले की, अपात्रतेची नोटीस देण्यात आलेल्या काँग्रेस आमदारांच्या याचिकेवर राजस्थान हायकोर्ट निर्णय देऊ शकते. तसेच हायकोर्टाच्या सुनावणीला स्थगिती देण्याची जोशी यांची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post