राज्यात पावसाचे पुनरागमनमाय अहमदनगर वेब टीम
पुणे - मंगळवार 14 जुलैपासून राज्यात पाऊस परत येत आहे. 14 ते 16 जुलैपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
 
गोवा ते दक्षिण केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा निर्माण झाल्याने राज्यातून कमी झालेला पाऊस पुन्हा वेगाने 14 जुलैपासून परत येत आहे. गेले काही दिवस मुंबई, कोकणसह, मराठवाडा, विदर्भातून पाऊस गायब झाला तो सध्या हिमालय रांगा, प. बंगाल, जम्मू-काश्मीर, झारखंड, बिहारपर्यंत मुसळधार पाऊस बरसतोय. त्या भागात कमी दाबाचे क्षेत्र असल्याने तिकडे अतिवृष्टी सुरू  आहे. 13 जूनपासून गोवा ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे राज्यभर 13 रोजी हलका पाऊस येईल. 14 पासून 16 जुलैपर्यंत तीन दिवस राज्यात सर्वत्र मुसधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
 
चोवीस तासांत खूप कमी पाऊस
 
गेल्या चोवीस तासांत राज्यात कमी पावसाची नोंद झाली. वेंगुर्ला 140, सावंतवाडी 130, कुडाळ 110 मीमी पाऊस झाला. हा भाग वगळता राज्यात शनिवार व रविवारी सायंकाळपर्यंत कुठेही मोठा पाऊस पडला नाही. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ भाग कोरडा होता. तसेच, घाटमाथा भागातही पावसाचा जोर पूर्ण कमी झाला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post