पालकमंत्री मुश्रीफ यांची संगमनेरकडे धावमाय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - राज्याचे महसूलमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यात कोरोना आटोक्यात येण्याचे चिन्हे नाहीत. दिवसेंदिवस कोरोना प्रादुर्भानवाची स्थिती बिकट होत चालली आहे. त्यामुळे अनेक संगमनेर तालुक्यातील दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होऊ लागला आहे. संगमनेरमधील ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी धाव घेतली आहे. पालकमंत्री मुश्रीफ गुरूवारी (ता. 9) संगमनेर तालुक्याच्या दौर्‍यावर आहेत.
संगमनेर आणि नगर शहरात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे. तो आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेचे प्रयत्न तोडके पडत आहे. काही ठिकाणी समन्वयाचा अभाव देखील दिसत आहे. त्यामुळे कोरोना वाढतो आहे, अशा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे. संगमनेर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा हा दीडशे पार गेला आहे. या आकड्यांवर ही परिस्थिती किती गंभीर आहे आणि त्याची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली आहे. दरम्यान, संगरमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा महसूलमंत्री थोरात यांच्या भगिनीच आहेत. त्यांचे मेहुणे देखील डॉ. सुधीर तांबे हे देखील विधान परिषदेचे आमदार आहेत. या लोकप्रतिनिधींनी परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेतला आहे. तरी प्रशासनकीय पातळीवर यंत्रणेला कोरोनाला आटोक्यात आणण्यात अपयश येत आहे. आता पालकमंत्री मुश्रीफ यांनी दखल घेत संगमनेर दौरा काढला आहे. या दौर्‍यात काय होणार याकडे आता लक्ष लागले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post