दर्जेदार कामांकडे प्रशासनाने लक्ष द्यावे
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- मनमाड रोडवरील कॉटेज कॉर्नर रस्त्याचे काम मंजूर झाले असून, पावसाळा संपल्यानंतर कामाला लगेच सुरुवात होणार आहे. मनमाड रोडला जोडणारा मुख्य रस्ता असल्यामुळे या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. त्यामुळे रस्ता खराब झाला आहे. या भागाचा विकास झपाट्याने वाढत असल्यामुळे लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नागरिकांचे मुलभूत प्रश्न सोडविणे आमचे कर्तव्य आहे. प्रशासनाने दर्जेदार कामांकडे विशेष लक्ष केंद्रित करावे. हलगर्जीपणा केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.

मनमाड रोडवरील कॉटेज या कॉर्नर खराब रस्त्याची पाहणी करताना आ. संग्राम जगताप, मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, बाळासाहेब बारस्कर, पै. शिवाजी चव्हाण आदी उपस्थित होते.


यावेळी बोलताना संपत बारस्कर म्हणाले की, नगर शहरातील प्रश्न मार्गी लागावे, यासाठी आम्ही आ. संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. मनपाच्या कामकाजावर आमचे बारीक लक्ष आहे. चुकीचे काम आम्ही होऊ देणार नाही. शहरातील विविध प्रश्न मनपाच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

प्रभागाच्या विकास कामांसाठी आ. जगताप व मनपाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देणार आहे. कॉटेज कॉर्नर रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. यासाठी आ. जगताप यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे निधी प्राप्त झाला आहे. रस्त्यावरील पडलेले खड्डे बुजविण्याचे काम तातडीने केले जातील. व पावसाळा संपल्यानंतर प्रत्यक्ष रस्त्याच्या कामांना सुरुवात होणार असल्याचे ते म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post