भारत सर्वात जास्त संक्रमित देशांच्या यादीत तिसऱ्या नंबरवर


माय अहमदनगर वेेेब टीम
 दिल्ली - भारतात कोरोनाची प्रकरणे रशियापेक्षा जास्त झाली. रविवारपर्यंत भारतात 6 लाख 85 हजार 85 रुग्ण झाले, तर रशियात 6 लाख 81 हजार 251 रुग्ण आहेत. यासोबतच भारत सर्वात जास्त संक्रमित देशांच्या यादीत तिसऱ्या नंबरवर गेला आहे. मागील 10 दिवसात भारतात संक्रमितांचा आकडा खूप वाढला आहे. रशियात जिथे 67 हजार 634 रुग्ण सापडले, तिथे भारतात 2 लाख 919 रुग्ण वाढले.

भारतात 6.85 लाख रुग्णसंख्या 158 दिवसात झाली. भारतात सरासरी 22 हजार रुग्ण दररोज सापडत आहेत. भारतात जून महिन्यात 3 लाख 87 हजार 425 रुग्ण वाढले. 21 जूननंतर दररोज 15 हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. तसेच, 4 जुलै रोजी सर्वाधिक 24 हजार 18 रुग्ण सापडले. तर, रशियात सर्वात जास्त संक्रमित मे महिन्यात सापडले. या महिन्यात रशियात 2 लाख 91 हजार 412 रुग्ण वाढले.

मास्क न घातल्यास 10 हजार दंड

केरळ सरकारने राज्यात कोरोनासंबंधित गाइडलाइन एका वर्षासाठी लागू केली आहे. यात मास्क घालणे, सोशल डिस्टेंसिंग, लग्न आणि इतर कार्यक्रमात ठराविक लोकांना बोलवणे इत्यादी आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यास 10  हजार रुपये दंड लावण्यात आला आहे. केरळमध्ये आतापर्यंत पाच हजार रुग्ण सापडले तर 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशातील रिकव्हरी रेट 60% पेक्षा जास्त

देशातील रिकव्हरी रेट 60% पेक्षा जास्त झाला आहे. 7 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश असे आहेत, जिथे ठीक होणाऱ्या रुग्णांचा दर 75% पेक्षा जास्त आहे. 4 राज्यात 80% पेक्षा जास्त आहे. यात चंडीगड टॉपवर आहे. इथे 86.06% रुग्ण ठीक झाले आहेत.कोरोना अपडेट्स:

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी ट्वीटरवर सांगितले की, "दिल्लीत रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या सातत्याने कमी होत आहे. अधिकाधिक लोक घरीच बरे होत आहेत. गेल्या आठवड्यात, दररोज 2300 रुग्ण आढळले. हॉस्पिटलमध्ये अजूनही 9900 बेड रिक्त आहेत."
कर्नाटकातील कुलबर्गीमध्ये आज संपूर्ण लॉकडाउन आहे. राज्य सरकारने राज्यभरात 2 ऑगस्टपर्यंत सर्व रविवारी संपूर्ण लॉकडाउनची घोषणी केली आहे.
देशात 4 जुलैपर्यंत 97 लाख 89 हजार 66 चाचण्या केल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) आज दिली. शनिवारी एका दिवसात 2 लाख 48 हजार 934 चाचण्या करण्यात आल्या.ल्ली -

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post