बीसीसीआयकडून टीम इंडियाच्या सरावासाठी 'या' तीन ठिकाणांवर चर्चा



माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - बीसीसीआय सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत भारतीय संघाच्या ट्रेनिंग कॅम्पसाठी संयुक्त अरब अमिरात, अहमदाबाद आणि धर्मशाला या तीन ठिकाणांबाबत चर्चा करण्यात आली. भारतामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता सप्टेंबर आणि नोव्हेंबर दरम्यान प्रस्तावित असलेल्या इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) स्पर्धेसाठी संयुक्त अरब अमिरातला पसंती मिळण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली आहे.

भारतीय संघातील खेळाडू मार्च महिन्यापासून क्रिकेट खेळलेले नाही. जर आयपीएल संयुक्त अरब अमिरात येथे झाले तर, भारतीय क्रिकेट तेथे स्पर्धेपूर्वी सराव करू शकतात. तेथे चांगल्या सुविधा आहेत. भारतातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता आयपीएलसाठी यूएईला पसंती मिळण्याची शक्यता आहे. धर्मशाला आणि अहमदाबाद देखील सराव शिबिरासाठी पर्याय आहेत. पण, भारतात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता यूएई हा सर्वोत्तम पर्याय आहे. असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.

यंदा दुबईत होणार आयपीएल?

बीसीसीआयने सप्टेंबर आणि नोव्हेंबर दरम्यान टी 20 स्पर्धेसाठी जागा राखून ठेवली आहे. पण, त्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान प्रस्तावित असलेलला टी 20 विश्वचषक रद्द करण्याबाबत आयसीसीने घोषणा केली तरच आयपीएलचा मार्ग मोकळा होऊ शकतो. आयसीसीच्या बोर्डाची बैठक सोमवारी होणार आहे त्यावेळी याबाबत घोषणा होणे अपेक्षित आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post