बनावट सोन्यावर कर्ज घेऊन फायनान्स बँकेची फसवणूक



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – बनावट सोने गहाण ठेऊन तसेच कर्जाचे हप्ते वेळेवर न भरून फायनान्स बँकेची 22 लाख 20 हजार 300 रूपयांची फसवणुक केल्याची घटना जना स्मॉल फायनान्स बँक लि., शाखा सावेडी येथे 26 ऑक्टोबर 2018 ते 3 फेब्रुवारी 20 दरम्यान घडली. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात बुधवारी (दि.8) रात्री 8 च्या सुमारास ठकबाजीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

लक्ष्मीकांत भानुदास देडगावकर, राजु रामराव बावधाने, चंद्रकांत भागवत गवळी, समीर हसन बेग, विद्या भारत पंडित, वैभव भास्कर अढागळे, शुभम गोरख शिर्के, देवीदास नामदेव शिंदे, राकेश संतोष पवार, भारत माणिक पंडित, शरद नानासाहेब पवार, विठ्ठल आजीनाथ गाडे, गणेश शंकर साळवे, अक्षय रावसाहेब बारवकर, अतुल कैलास अनभुले, जयश्री रावसाहेब बारवकर, अजित आकाराम सुरवसे, अलीम इसहाक सय्यद, महेश कृष्णकांत काळे, राहुल अशोक आव्हाड, अमोल रमेश घोडेचोर, पंजाब रामदास रूपनर, सागर रामदार रूपनर, संजय बन्सीलाल सानप यांनी संगनमत करून धातुचे दागिने खरे आहेत, अशा प्रकारचे बनावट प्रमाणपत्र तयार करून बनावट प्रमाणपत्राचा वापर करून बनावट दागिण्यांवर वेगवेगळे 38 सोनेतारण कर्ज प्रकरणे करून बँंकेकडुन 22 लाख 20 हजार 300 रूपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणुक केली.

या प्रकरणी बँक व्यवस्थापक मिलिंद मधुकर आळंदे (वय-38, रा. साईस्वप्न अपार्टमेंट, एल अ‍ॅण्ड टी कॉलनी) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी भारतीय दंड विधान कायदा कलम 420, 468, 471, 34 प्रमाणे ठगबाजीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पिंगळे करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post