कोरोना रूग्णांसाठी विशेष मोफत हिलींग सेवा उपलब्ध


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - कोरोना आजारामुळे आज संपूर्ण विश्व चिंतीत आहे. यामुळे समाज व्यवस्था ढासळू पहात आहे. सर्व जनता भयभीत झाली आहे. दिवसेंदिवस कोरोना आजाराच्या रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. याला आळा घालण्यासाठी भारत सरकार, महाराष्ट्र सरकार, प्रशासन, वैद्यकीय डॉक्टरांची टीम, आरोग्य रक्षक, पोलिस यंत्रणा मनापासून प्रयत्न करीत आहे. तरी सुध्दा परंतु हवे तसे यश मिळत नाही. कोरोना या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न करणे आवश्यक आहे म्हणूनच मेडिसीन सोबत मेडिटेशनचाही उपयोग व्हावा व त्याद्वारे कोरोना बाधीत रूग्णांना मोफत हिलिंगची सेवा द्यावी. या उद्देशांनी राजयोगा हिलिंग ग्रुपची स्थापना करण्यात आली, अशी माहिती ग्रुपच्या संचालिका डॉ. सुधा कांकरिया यांनी दिली.

सदर राजयोगा हिलिंग ग्रुपचा शुभारंभ नुकतेच राजयोगिनी ब्रह्माकुमारी राजराजेश्वरी दिदी यांच्या हस्ते ब्रह्माकुमारी सेंटरमध्ये झाला. सदर प्रसंगी डॉ. सुधा कांकरिया, डॉ. प्रकाश कांकरिया बीके प्रभा दिदी, बीके साधना दिदी, बीके मुन्नी दिदी उपस्थित होत्या. या उद्घाटन प्रसंगी राजराजेश्वरी दिदी म्हणाल्या, गेल्या अनेक वर्षापासुन राजयोगी हिलिंगची विधी जाणतात व हिलिंग सेवा करीत आहेत. परंतु आता खास कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सदर राजयोगा हिलिंग ग्रुप कार्यान्वयित झाला आहे मी त्यांचे अभिनंदन करते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post