कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये कोरोना स्राव




माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर -  भिंगारमध्ये कोरोना रुग्ण वाढत आहे. त्यामुळे सर्व संशयित व्यक्तींची तपासणी लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. त्यासाठी नगर कॅन्टोन्मेंट बोर्डाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये कोरोना स्राव संकलन केंद्र ९ जुलैपासून सुरू केले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांनी दिली.
मागील ८-१० दिवसापासून नगर कॅन्टोन्मेंट बोर्डच्या भिंगार शहरांमध्ये कोरोना आजाराचे एकूण १० रुग्ण सापडले आहेत. त्या रूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्राव नमुने घेण्यासाठी यापूर्वी जिल्हा रुग्णालय येथे पाठविले जात होते. जिल्हा रुग्णालयावर संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी असल्याने घशातील स्राव नमुने घेण्यास उशीर होत आहे.
यातून रुग्णांची गैरसोय होत होती. सदरचे संकलन केंद्र सुरू झाल्याने भिंगारमधील नागरिकांना लाभ होणार आहे. स्राव संकलनासाठी कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमधील दोन वैद्यकीय कर्मचार्‍यांना जिल्हा रुग्णालयातून प्रशिक्षण देण्यात आले आहे. डॉ. एस. आर. जैस्वाल यांचे या सर्व कार्यवाहीवर लक्ष राहणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post