त्या पाकिस्तानी क्रिकेटरला रोहित-धोनीची भूरळ



माय अहमदनगर वेब टीम
लाहोर -  पाकिस्तानी क्रिकेटपटू कामरान अकमलने भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीचे कौतुक केले आहे. रोहितसारखे कोणीही नसल्याचे अकमल म्हणाला.

यू-ट्यूब चॅनेलवर अकमलने ही प्रतिक्रिया दिली. तो रोहितबद्दल म्हणाला, ‘महान, अविश्वसनीय फलंदाज. त्याला फलंदाजी करताना पाहून बरे वाटले. त्याची फलंदाजी, स्वभाव, त्याचे समर्पण अविश्वसनीय आहे. २०१९ एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत पाच शतके आणि तीन दुहेरी शतके करणारा तो एकमेव फलंदाज आहे.‘

अकमल पुढे म्हणाला, ‘त्याच्या फलंदाजीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे पॉवर हिटिंग. मी सर्व तरुणांना आवाहन करतो की त्यांनी रोहित, बाबर आझम, विराट कोहली यांना पाहावे.‘

अकमलने भारतीय यष्टिरक्षक फलंदाज धोनीचे भारताचा सार्वकालिन महान खेळाडू म्हणून वर्णन केले. तो म्हणाला, ‘भारताचा अष्टपैलू महान यष्टिरक्षक फलंदाज ज्याने देशासाठी बरेच काही साध्य केले. अविश्वसनीय. धोनीला बरेच श्रेय जाते. एकदिवसीय वर्ल्डकप, टी-२० वर्ल्डकप, आयपीएल, चॅम्पियन्स ट्रॉफी. मला वाटते की त्याने कर्णधार म्हणून सर्व काही जिंकले आहे.’

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post