लग्नसोहळा या दोन्ही पक्षाला पडला महागात


माय अहमदनगर वेब टीम
दिंडोरी - दिंडोरी तालुक्यातील उमराळे रोडवरील धुमणे लॉन्स येथे लग्नसमारंभात दीडशे ते दोनशे लोक एकत्र आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक कल्पेश कुमार चव्हाण यांनी सदर लॉन्सवर जाऊन चौकशी करून संबंधितावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. लॉन्सवर जाऊन चौकशी केली असता तेथे जास्त लोकांचा समुदाय आढळून आला.

सोशल डिस्टंसिंग तसेच इतर आवश्यक नियमांचे पालन न केल्याने लॉन्स मालक जयंत धुमणे पाटील, (राहणार-उंटवाडी, नाशिक,) लाँन्स भाड्यावर घेणारा इसम पंकज राजेंद्र सोनवणे ,(वय २५ )राहणार- पाथर्डी फाटा, दामोदर नगर ,नाशिक, सुनील भिकाजी भोये, राहणार-उमराळे (वधूपक्ष), विजय बाबूराव बर्डे राहणार-वणी (वर पक्ष) यांच्यावर दिंडोरी पोलीस ठाण्यात भादवि कलम१८८,२६९,२७०,२७१,२९० सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३)/१३५ सह साथरोग प्रतिबंधक अधिनियमचे कलम २,३,४, महाराष्ट्र कोव्हिड १९ उपायोजना नियम २०२० चे नियम ११ व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे उल्लंघन कलम ५१ ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post