जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या हजाराकडे!


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या एक हजाराचा टप्पा ओलांडण्याच्या उंबरठ्यावर आली आहे. रविवारी (दि. 12) आणखी 6 रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 963 झाली आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.

जिल्हा शासकीय रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये काल आणखी 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 193 व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले. नव्याने 6 रुग्ण वाढले असून यामध्ये नगर शहरातील सर्जेपुरा भागातील 3, पाईपलाईन रोड 1, नगर ग्रामीणमध्ये विळद 1 आणि पाथर्डी येथील 1 रुग्ण आढळून आला. नागरिक स्वयंस्फूर्तीने तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात जात आहेत. सुमारे 855 जणांच्या अहवालाची तपासणी अद्याप बाकी आहे.

संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्या खालोखाल नगर शहर, जामखेड, पारनेर तालुक्यात रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. प्रत्येकाने दक्षता घेण्याची गरज निर्माण झाले आहे. नगर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता 307  झाली आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 963 झाली आहे.

जिल्ह्यात काल सकाळी 66 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 634 झाली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post