भाजप व वैकय्या नायडू यांचा शिवसेनेच्यावतीने नगरमध्ये निषेध


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- राज्यसभेच्या शपथविधी प्रसंगी घडलेल्या प्रकाराबाबत भाजप व वैकय्या नायडू यांनी माफी मागावी या मागणीचे निवेदन शिवसेनेच्यावतीने अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. चोरमारे यांना देण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, उपजिल्हाप्रमुख गिरिष जाधव, आनंद लहामगे, अर्जुन दातरंगे, सुरेश तिवारी, अमोल येवले, रामदास भोर, विशाल वालकर आदि उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, 22 जुलै 2020 रोजी राज्यसभेमधील नवनिर्वाचित निवडून आलेल्या सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडला.सदर शपथविधी दरम्यान खा.उदयनराजे भोसले यांच्या शपथविधी नंतर राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख करु नये व सदन माझे आहे, अशा प्रकारे नियम पाळावे, ही सूचना दिली. छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपुरुष असून, रयतेचे राजे आहेत. झालेल्या घटनेची नगर शहर शिवसेना तीव्र निषेध करते, भाजप पक्षाने व वैकय्या नायडू यांनी त्वरित माफी मागावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post