सारा अली खानच्या ड्रायव्हरला कोरोना


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - बच्चन कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानच्या घरात कोरोनाने शिरकाव केला आहे. सारा अली खानने काल रात्री इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिनं सांगितले की, तिच्या ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाली आहे. ड्रायव्हरला क्वारंटाईन सेंटरला पाठवण्यात आले आहे.

सारा अली खानने इन्स्टावर लिहिलंय की, आमच्या ड्रायव्हरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. रिपोर्ट मिळताच बीएमसीला सूचना दिली. माझ्या परिवाराचे लोक आणि घराच्या सर्व स्टाफचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. बीएमसीकडून मार्गदर्शन मिळत आहे, त्यासाठी धन्यवाद.

वरूण धवनसोबत आगामी चित्रपट

सारा अली खान वरुण धवनसोबत चित्रपट ‘कुली नंबर-१’ मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट पूर्णपणे बनून तयार झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर  मार्च किंवा एप्रिलला रिलीज होणार होता. परंतु, कोरोनामुळे हे टाळण्यात आले. थिएटर्स सुरू झाल्यानंतर हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post