देशात गेल्या २४ तासांत २४ हजार ८७९ रुग्णांची नोंदमाय अहमदनगर वेब टीम
मुंबई - देशातील करोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे आता करोनाग्रस्तांच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे. करोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसागणित मोठी भर पडत आहे. मागील २४ तासांत २४ हजार ८७९ रुग्णांची मोठी भर पडली असून ४८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या वाढीमुळे देशातील करोना बाधितांचा आकडा ७ लाख ६७ हजार २९६ वर पोहचला आहे.

दरम्यान करोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून एकूण रुग्णसंख्येपैकी २ लाख ६९ हजार ७८९ अक्टीव्ह केसेस आहेत. म्हणजे या रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ४ लाख ७६ हजार ३७८ रुग्णांची प्रकृती सुधारल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान एकूण २१ हजार १२९ रुग्ण कोविड-१९ संसर्गामुळे दगावले आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

देशातील करोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत असली तरी करोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही दिलासादायक आहे. त्यामुळे देशाचा रिकव्हरी रेट सातत्याने सुधारत आहे. त्यामुळे देशाचा रिकव्हरी रेट ६१.१३ टक्के इतका आहे. दरम्यान महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू येथे करोना बाधितांची संख्या सर्वाधिक आहे. तर एकट्या महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत एकूण ६ हजार ६०३ नव्या रुग्णांची नोंद झाली असून बाधितांचा आकडा २ लाख २३ हजार ७२४ वर पोहचला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post