आता आयपीएलचा मार्ग मोकळामाय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली  - करोना संकटामुळे टी-20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलण्यात आलं आहे. ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात ही स्पर्धा होणार होती. मात्र जगभरात करोनाने थैमान घातले असल्याने आयसीसीने International Cricket Council ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आयसीसीने सोमवारी अधिकृत घोषणा केली. ऑस्ट्रेलियाने आयोजन करण्याबद्दल असमर्थता दर्शवल्यानंतर अखेरीस आयसीसीने ICC हा निर्णय घेतला आहे.

ऑस्ट्रेलियात 18 ते 15 नोव्हेंबरदरम्यान विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मात्र करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेतला ऑस्ट्रेलियन सरकारने 30 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण देश लॉकडाऊन केला आहे. तसंच, लॉकडाऊनच्या काळात ऑस्ट्रेलियाची आर्थिक बाजूही अस्थिर झाल्याने विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यास असमर्थ असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्यानंतर स्पर्धेचं आयोजन पुढे ढकलणं जाणं ही फक्त एक औपचारिकता मानली जात होती.

दरम्यान 2021 साली होणारा टी-20 विश्वचषक हा ऑक्टोबर-नोव्हेंबर या काळात खेळवला जाईल असंही आयसीसीने जाहीर केलं आहे. टी-20 विश्वचषकाचं आयोजन पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता बीसीसीआयला BCCI आयपीएलच्या IPL तेराव्या हंगामाचं आयोजन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post