“संधिवात” बरा करायचा असेल तर 'हे' कराच



माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - संधीवाताचे दुखणे हा अत्यंत हैराणीचा आजार आहे. कारण  संधिवातामुळे हातापायाला सूज येते. किंवा तो अवयव कामच करत नाही. सूज आल्यामुळे वेदना खूप होतात. यावर आपण अनेक उपाय करतो. परंतु त्याचा थोडा वेळ बरे वाटले कि,पुन्हा वेदना सुरु होतात. अशावेळी आपल्याला वाटते कि, संधिवातावर काहीही उपाय केला तरी तो बराच होत नाही. पण आपला गैरजमज असतो. कारण कोणताही आजार असेल तर तो फक्त  गोळ्या-औषधाने बरा होत नाही. त्यासाठी आपल्याला आहारातही बदल करावे लागतात.आणि संधिवाताला तर आहाराचे खूप महत्व आहे.

* संधिवात बरा होण्यासाठी खालील पथ्ये पाळा *

१) संधीवात असणाऱ्या व्यक्तींनी  मासे, गोड पदार्थ  खाणे टाळावे.

२) जे पदार्थ पचन्यास जड आहेत. ते खाऊ नये.

३) हरभरा, वाटाणा , बटाटा हे पदार्थ वात निर्माण करतात. त्यामुळे यांचा आहारात समावेश करणे टाळावे.

४) तेलकट, खारट, तसेच थंड पदार्थ खाऊ नये. थंड पदार्थानी सांध्यास सूज येते.

५) व्यसन करणेही संधिवातासाठी घातक आहे.

* संधिवात बरा  होण्यासाठी या पदार्थांचा आहारात समावेश करा. *

१) संधिवात बरा होण्यासाठी पौष्टीक आहार घ्यावा.

२) हिरव्या पालेभाज्या, लसूण, तूप, मनुका  या पदार्थांचे सेवन करावे.

३) संधिवात असणाऱ्यांनी आले खावे. कारण त्यामुळे रक्त प्रवाह सुधारतो.

४) बिट उकडून खावे कारण त्यातून कॅल्शियम मिळते. आणि पाणी नेहमी उकळून प्यावे. संधिवात बरा होण्यासाठी जर वरील पथ्य पाळली. तर संधिवात लवकर बरा होण्यास मदत होईल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post