गावठी पिस्तुल घेऊन फिरणारे जेरबंद
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - पाथर्डी ते खरवंडी कासार रस्त्यावरील तुळजवाडी फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून गावठी पिस्तूल घेऊन फिरणार्या दोघांना अटक केले.
रोहिदास उर्फ रोहित अशोक गायकवाड (रा.खरवंडी कासार), दादासाहेब उर्फ लक्ष्मण मल्हारी वाळके (रा.कोरडगाव ता.पाथर्डी) असे पकडण्यात आलेल्याची नावे आहेत. या दोघांकडे २५ हजार किंमतीची गावठी पिस्तूल, ४०० रुपयांचे काडतूस व १ लाख रुपयांची दुचाकी, असा एकूण १ लाख २५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस कर्मचारी संदीप चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, पोना ज्ञानेश्वर शिंदे, रविंद्र कर्डीले, रवि सोनटक्के, पोकाँ रणजित जाधव, शिवाजी ढाकणे, संदीप चव्हाण, मेघराज कोल्हे, संभाजी कोतकर आदिच्या पथकाने ही कारवाई केली.
Post a Comment