तब्येत सांभाळायची आहे? मग पावसाळ्यात हे पदार्थ आवर्जून खा!


माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - पावसाळ्यामध्ये वातावरणात सतत बदल होत असतात. या बदलांमुळे हवेतील विषाणूंचे प्रमाण वाढते .त्यामुळे मलेरिया, डेंग्यू, टायफाइड यांसारख्या  आजारांचे प्रमाण वाढते . हे टाळण्यासाठी पावसाळ्यात योग्य आहार घेणे गरजेचे आहे.

लिंबू पाणी

पावसाळ्यामध्ये थकवा, चक्कर, आणि  पोटांचे विकार वाढतात. म्हणून लिंबू पाणी घ्यावे. लिंबू पाणी प्यायल्याने ऊर्जा मिळते, पचनक्रिया सुधारते तसेच मधुमेहासाठी फायद्याचे असते.

हलका आहार


पावसाळ्यामध्ये ताप, सर्दीसारख्या आजारांचे प्रमाण वाढते. तापामुळे  जीभेची चव जाते. सगळे पदार्थ बेचव लागतात. अशावेळी  हलका आहार घ्यावा. त्यामध्ये वरण-भात खाल्ल्याने जीभेला चव येते तसेच ते पचायला सोपे असते.

कडधान्य

पावसाळयात आहारामध्ये कडधान्याचा समावेश करावा. कारण कडधान्यातून प्रथिने, जीवनसत्वे मिळतात.

सूप

पावसाळ्यात गरम सूप पिल्याने थकवा जातो. तसेच सर्दी, ताप आणि डोकेदुखी दूर व्हायला मदत होते. त्यामध्ये असणाऱ्या पालेभाज्यांमधून व्हिटॅमिन सी मिळते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post