ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली मोबाईल दुकानदारांचे चांगभले



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - करोणा विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र शिक्षण क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग राबवले जात आहे हे प्रयोग राबवत असताना शिक्षणाचा पुरता पोरखेळ झालेला दिसून येत आहे त्यात खास करून ग्रामीण भागातील पालकांसमोर ऑनलाइन शिक्षणाची मोठी डोकेदुखी ठरलेल्या दिसून येत आहे.

यात ग्रामीण पालन त्यांना अगोदरच आर्थिक अडचण त्यात शेती व्यवसाय सांभाळून विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण करणे त्यात अशा प्रसंगी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देणे ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असला पाहिजे. अँड्रॉइड मोबाईल विकत घेण्यासाठी दहा हजाराच्या पुढे अँड्रॉइड मोबाईल हा मिळत असतो. कुटुंबांमध्ये दोन भावंड असतात.

दोघं भावंडांना दोन मोबाईल घेणे अजिबात शक्य नाही. मग हे दोघं भावंड वेगवेगळ्या वर्गातील वेगळ्या विषयाचा ऑनलाईन शिक्षण कसे घेतील. त्यात ग्रामीण भागामध्ये कनेक्टिव्हिटीचा अभाव मोबाईलची नेटवर्क व्यवस्थित राहत नाही. ग्रामीण पालक फारसे शिकलेले नसतात विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवतील कसे अशा एक ना अनेक समस्या ग्रामीण पालकांसमोर उभे ठाकलेले आहेत.

मोबाईल घेण्यासाठी मुलांचा अट्टाहास पाहता  नगर जिल्ह्यतील
 मोबाईल दुकानांवर मोठ्या प्रमाणात मोबाईल घेण्यासाठी पालकांची गर्दी झाल्याचे गेल्या आठ ते दहा दिवसापासून दिसून येत आहे.

ऑनलाईन शिक्षणाच्या गोंडस नावाखाली ग्रामीण पालकदेखील नाकीनव आलेले आहेत ऑनलाईन शिक्षण किती विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरेल हा देखील एक प्रश्नच आहे. ग्रामीण पालकांकडे सरासरी पाहिल्यास १० ते १५ टक्केच विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेऊ शकतात. त्यात ते देखील त्यांना किती प्रभावी ठरेल हा देखील एक प्रश्नच आहे? ज्या विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत त्यांच्या ऑनलाईन शिक्षणाचे काय साध्या मोबाईल वरून शिक्षक फक्त पालकांची संपर्क साधून विद्यार्थी अभ्यास करतो किंवा नाही एवढेच फक्त सांगू शकतात किंवा प्रत्यक्ष पालक भेट घेऊ शकतात आणि विद्यार्थ्यांची चौकशी करू शकतात रंतु त्यांच्या खर्‍या अर्थाने शिक्षणाचे काय हे वास्तव चित्र आहे त्यां काय? आणि शिक्षण विभाग म्हणतय शिक्षण सुरू करा शाळा बंद ठेवा शिक्षणापासून कोणी वंचित राहायला नको यातून बहुतांश विद्यार्थी वंचित तर राहणारच हे कोणीही नाकारू शकत नाही वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना शिक्षण पोहोचवा यात मोबाईल वरून वेगवेगळे ॲप वापरा त्यात दीक्षा ॲप, झूम ॲप, युट्युब वरून वेगवेगळ्या ऑनलाइन चॅनेल्सवरून दूरदर्शन वरून शिक्षण दूरदर्शनवर फ्री टू वेअर चैनलवर अशा किती वहिनी आहेत. तिथे स्टेट लेव्हलचे अभ्यासक्रम असलेले चॅनेल किती आहेत सेमी, नॉनसेमी साठी किती कार्यक्रम या वाहिनीवरून आपल्याला बघावयास मिळतात.

तसेच विद्यार्थ्यांना रेडिओवरून शिक्षण द्या असे किती विद्यार्थी आहेत की ज्यांच्याकडे आज रेडिओ आहेत . रेडिओवरून शिक्षण कशा पद्धतीने दिले जात आहे. याचा आराखडा तयार नाही .या संपूर्ण गोष्टी ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली विचार करायला लावणाऱ्या आहेत .

ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया जिल्हा स्तरावर किंवा तालुका स्तरावर काही अशी यशस्वी ठरू शकते. परंतु ग्रामीण भागात याचे चित्र फारसे चांगले दिसून येत नाही हे तितकेच सत्य आहे.पण कटू आहे. हे सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस विद्यार्थी हाताळत असताना त्यांच्या शरीरात वाजताचा देखील या ठिकाणी विचार होणे गरजेचे आहे हे करत असताना विद्यार्थी तासनतास मोबाईल टीव्हीवरून अशा प्रकारचे डिव्हाइसेस सतत हाताळत असल्यास त्यांच्या शरीरात स्वास्थाचा देखील विचार होताना या ठिकाणी दिसून येत नाहीये हे देखील भयावह आहे.

करोनामुळे, विद्यार्थ्यांची शाळा बंद झाली असली तरी शिक्षण सुरू राहिले पाहिजे, यासाठी सर्वच ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्याचे सुरू केले आहे. हे करत असताना वंचित विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे लॉक डाउन होऊ नये म्हणजे झाले !

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post