त्या खून प्रकरणत आजोबा आणि मामास अटक




माय अहमदनगर वेब टिम
अकोले/राजूर - अकोले तालुक्यातील चिचोंडी परिसरातील कृष्णवंती नदी पात्रातील तरुणाच्या खुनाचा छडा लावण्यात राजूर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी या तरूणाचे आजोबा व मामास अटक करण्यात आली आहे.

दि. 2 जुलै रोजी चिचोंडी शिवारातील कृष्णावती नदीवर असलेल्या पुलाखाली एका अनोळखी इसमाचे शरिराचे नऊ तुकडे करुन ते वेगवेगळ्या दोन पोत्यामध्ये भरुन पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने फेकून देण्यात आले होते. या घटनेबाबत चिचोंडी गावचे पोलीस पाटील अंकुश रामचंद्र मधे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राजूर पो.स्टे. येथे गुरनं. 1209/2020, भादवि कलम 302, 201 प्रमाणे अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेवून तातडीने जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह , अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, पोलीस उपअधीक्षक रोशन पंडीत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी गुन्हा घडले त्या ठिकाणी भेट देवून गुन्ह्याची सविस्तर माहीती घेतली. गुन्ह्याचे तपासकामी वेगवेगळी पथके नेमण्यात आली. तपासात अकोले तालुक्यातील खिरविरे येथील प्रदीप सूरेश भांगरे(वय 25 वर्षे ) हा दि. 27 जून पासून बेपत्ता असल्याबाबत माहीती मिळाली. मयताचे गळ्यामध्ये व उजवे हाताचे मनगटामध्ये असलेल्या दोर्‍यावरुन मयताचे नातेवाईक भाऊ संचित सुरेश भांगरे यांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाची पाहणी करुन हा मृतदेह त्याचा भाऊ प्रदीप याचे असल्याचा संशय व्यक्त केला.

तसेच तपासा दरम्यान मयत वापरत असलेली हिरो होंडा मो. सा. नं. एमएच-15-सीसी-9933 ही बाभूळवंडी शिवारातील रस्त्याचे कडेला असलेल्या झुडपामध्ये मिळून आली. परिसरामध्ये व आजूबाजूच्या परिसरामध्ये फिरुन पालिसांनी माहीती घेतली असता मयत व त्याचे आजोबा कमलाकर डगळे रा. खिरविरे, ता. अकोले यांच्यात नेहमी वाद होत होते, अशी माहिती मिळाल्याने आजोबा कमलाकर हणमंत डगळे,(वय- 70) यांना ताब्यात घेवून कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली देवून प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचा मुलगा हरिचंद्र याची मदत घेवून सदर प्रेताची विल्हेवाट लावली असल्याचे सागितले.

त्यावरुन आरोपी हरिचंद्र कमलाकर डगळे (वय- 35) यास. यवत ता. दौंड जि. पुणे) येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. आरोपीकडे गुन्हा बाबत कसून चौकशी केली असता आरोपी कमलाकर हणमंत डगळे याने सांगीतले कि, मयत प्रदीप सुरेश भांगरे, वय-25 वर्षे हा नातू असून तो नेहमी दारु पिण्यासाठी पैशाची मागणी करुन त्रास देत असे, त्यावरुन आमचे वाद झालेले होते.

दि. 27 जुन रोजी संध्याकाळी नातू प्रदीप सुरेश भांगरे हा त्याचे मोटार सायकल घेऊन दारु पिण्यासाठी पैसे मागणे करीता आला होता. त्यावरून वाद झाल्याने कोयत्याने वार करुन त्याची हत्या केली असल्याचे सांगीतले..

सदर गुन्ह्यांमध्ये कोणताही पुरावा नसताना पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी या गुन्ह्याचा कुशलतेने तपास करुन गुन्हा उघडकीस आणलेला असून पुढील तपास राजुर पो.स्टे. करीत आहेत.

या गुन्हाचा तपास .सहा.पो.नि.नितीन पाटील, गणेश इंगळे, नितीन खैरनार, स्थानिक गुन्हे शाखेचे स.फौ.नानेकर, पो.ना.संदीप पवार, रविन्द्र कर्डीले, संतोष लोढे, भागीनाथ पंचमूख, योगेश सातपूले, राहूल सोळूके, दिपक शिंदे, मेघराज कोल्हे, रविन्द्र घुंगासे, चा.पो.ना.भरत बुधवंत, चा.पो.कॉ.घाडगे, स फौ. प्रकाश निमसे, पो.ना.किशोर तळपे, पो.कॉ अशोक गाडे, दिलीप डगळे, चा. पो.कॉ. राकेश मुलानी यांनी संयुक्तरित्या केलेला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post